शिराढोण – तालुक्यातील हसेगाव (शि.)शिवारात गौरगाव येथील शेतकऱ्याच्या एका गाय व बैलाच्या नरडीचा घोट घेत अज्ञात हिस्त्र वन्य प्राण्याने जीव घेतला. घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने भेट दिली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. गौरगाव येथील हनुमंत धोंडीराम बोळके याचे लगतच्या हसेगाव (शि.)शिवारात सर्वे क्रमांक 232 मध्ये जमीन आहे.सदर शेतातील बोळके यांचा पशुधनाचा गोठा आहे.त्यात आपल्या पशुधनास नियमित बांधत असत.शनिवारी सायंकाळी त्यांनी आपले पशुधन गोठ्याच्या बाहेर बांधून घर गाठले होते.रविवारी शेतात गेल्यावर मात्र यापैकी एका पाच वर्षीय गाईचा व तीन वर्षीय बैलाचा अज्ञात हिंस्त्र प्राणी आणि नरडीचा घोट घेत बळी घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर याची माहिती वन विभागाला देण्यात आली.वन परिमंडळ अधिकारी डी.व्ही.फरताडे,वनरक्षक सतीश साळुंखे,सरपंच सचिन कापसे, श्याम कापसे व शिराढोण पोलीस,कोतवाल अन्य काही नागरिक घटनास्थळी दाखल झाले.वन विभागाच्या पथकाने पाहणी केली.काही निरीक्षणे नोंदवली.त्यानंतर निपाणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी दत्तात्रय आवळे यांनी शवविच्छेदन केले. तलाठी व ग्रामसेवक मात्र अनुपस्थितीत होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.यामुळे शिराढोण परिसरात अज्ञात हिंस्त्र प्राण्यांच्या धास्तीने रस्ते भीतीने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरीकांची संख्या रोडावल्याने रस्ते सामसूम झाले आहेत.
More Stories
‘दैनिक लोकमत’ समूहातर्फे शिराढोण येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न आला.
खर्च वाचला तर आत्महत्या थांबतील – सत्यपाल महाराज
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर