August 8, 2025

संविधान जागर निमित्ताने नगर परिषद शाळेस संविधान भेट

  • कळंब – येथील नगर परिषद शाळेत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,बार्टी पुणे समतादूत प्रकल्प तालुका कळंब यांच्या वतीने भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ घर घर संविधान उपक्रमा अंतर्गत समतादूत अर्चना रणदिवे यांच्या कडून संविधानाची एक प्रत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेजा पायाळे यांना भेट देण्यात आली.
    यावेळी शाळेचे शिक्षक,विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी संविधान उद्देशिका वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
error: Content is protected !!