संभाजी नगर – सत्ता,संपत्ती, जात,धर्मांधतेच्या जोरावर लोकशाही धोक्यात आणली जात आहे.याच्या निषेधार्थ आणि संविधानातील विचार व मुल्यं देशात रुजविण्यासाठी, फुलवण्यासाठी आणि संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे नेते डाॅ.बाबा आढाव यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ सकाळी दहा वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे येथील महात्म्या फुले यांच्या वाड्यात तिन दिवसांचे “आत्मक्लेश उपोषण” सुरू केले आहे. या आत्मक्लेश उपोषणात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे,भारत जोडो अभियानच्या संयोजक साथी उल्का महाजन,राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक साथी नितीन पवार यांचाही समावेश होता. आ. रोहीत पवार व आ. कपिल पाटील यांनी बाबांची भेट घेवून मागण्यांना पाठिंबा तर दिलाच पण ९५ वर्षाच्या बाबांनी त्यांच्या तब्येतीची प्रथम काळजी घ्यावी अशा भावना व्यक्त केल्या. दि.२८ रोजी महात्मा फुले यांचा स्मृति दिन असल्याचे,विविध पक्ष – संघटनांचे कार्यकर्ते फुले वाड्यात येत होते.तेंव्हा ते आवर्जून बाबांची विचारपूस करतांना दिसत होते अशी माहिती साथी सुभाष लोमटे यांनी दिल्याचेही पत्रकात नमूद केले आहे. बाबांच्या या विचार भूमिकेला आणि कृतीला पाठींबा दर्शविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मराठवाडा लेबर यूनियन, भारत जोडो अभियान, जय किसान आंदोलन, स्वराज अभियान, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी शेतकरी शेतमजूर पंचायत ई. संघटनांच्या वतीने महात्मा फुले, महात्मा गांधी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान भवन छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंतच्या उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.हे उपोषण दिनांक १८,२९,३० नोव्हेंबर असे तिन ही दिवस करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. या उपोषणास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उपोषणास बसलेले उपोषणार्थी सर्वश्री ॲड.सुभाष सावंगीकर,प्रविण सरकटे,देविदास किर्तीशाही,सर्जेराव जाधव, सदाशिव सोळंके,बाळू हिवराळे, राहूल धनेधर,गणेश तरटे,सतीश साळवे,अनिल जगधने,अजय सुरडकर,ज्ञानेश्वर नवगिरे ई.नी केले आहे.
More Stories
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर
सस्ती अदालत उपक्रमातून 560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे
हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण