August 8, 2025

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञान प्रसारमध्ये अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील मोहा येथे ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी प्रा.नवनाथ करंजकर यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!