कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३४ व्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या शैक्षणिक चळवळीत योगदानाची माहिती ही भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विषय प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी सांगितली. यावेळी प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक केतन पौळ,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी