उमरगा – समाज विकास संस्थेच्या वतीने दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी पालावर राहणाऱ्या लेकींना एकत्र करून बालिका दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी समाज विकास संस्थेचे आणि महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय कार्यवाह,भूमिपुत्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार लक्ष्मण पवार सांगय्याजी स्वामी, प्रशांत ढवळे,रंजना हे उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीमध्ये पालावर राहणाऱ्या लेकरांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी कपड्याचे वाटप करून बालिका दिन साजरा करण्यात आला. सामाजिक बदलाचे कार्यक्रम घेणाऱ्या समाज विकास संस्थेचे परिसरातून कौतुक होत आहे.
More Stories
बसस्थानकाच्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय