कळंब – रविवारी कथले चौक येथून श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरापासून भगवान महावीरांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. जैन समाजाच्या पर्युषण पर्वाची सांगता या मिरवणुकीने व महाप्रसादाने करण्यात आली. ऋषी पंचमीपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन कळंब मंदिरात पर्युषण पर्व संपन्न झाले. याकाळात पूजा,अभिषेक, आरती,प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी शहरातून श्री 1008 पार्श्वनाथ भगवंतांची मिरवणूक काढून या पर्वाची सांगता करण्यात आली. मिरवणुकीमध्ये समाजातील युवक, युवती,महिला,पुरुष, लहान मुले सहभागी झाली होती. मिरवणूक झाल्यानंतर मंदिरात येऊन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप सुभाष संगवे व श्रीकांत संगवे परिवाराकडून करण्यात आले. या वेळी वर्षभरात कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल परस्परांची क्षमा मागून ‘क्षमापना दिन’ साजरा करण्यात आला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी