June 20, 2025

संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन

  • पिंपळगाव (लिंगी) – वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील संभाजी विद्यालयात ज्ञानप्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त प्रशालेतर्फे अभिवादन करण्यात आले.
    यावेळी सुरवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक वाय.बी.सावंत यांचे हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर या प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी मोहेकर गुरुजींच्या कार्याविषयी व त्यांच्या महती विषयी सुंदर शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
    यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक वाय.बी. सावंत यांनी गुरुजींच्या शिक्षण कार्या विषयी माहिती दिली.
    या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक जगताप एस.पी.यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
    शेवटी प्रशालेचे सहशिक्षक बोडके एस. एम.यांनी सर्वांचे आभार मानले व या कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!