August 9, 2025

भिम आर्मीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने हजर राहावे – विनोद कोल्हे

  • लातूर (जयप्रसाद घोडके) – भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आजाद,राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग यांच्या आदेशाने महाराष्ट्रात सर्वत्र समीक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी लातूर येथील डॉ.भालचंद्र ब्लड बँक या ठिकाणी ठिक १०.०० वाजता समीक्षा बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीस महाराष्ट्र प्रभारी अनिलजी धनेवाल,राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
    या बैठकीला मराठवाड्यातील सर्व मराठवाडा पदाधिकारी, जिल्हाप्रमुख,सर्व तालुकाप्रमुख, आणि शहर प्रमुख यांनी उपस्थित राहावे बैठकीस येताना आतापर्यंत आपल्या कामाचा अहवाल आपण सोबत घेऊन यावा,तसेच आपले कार्यकारणीही सोबत असावी.पावसाचे दिवस असल्याकारणाने आपण लवकर निघून वेळेवर हजर राहावे,ही समीक्षा बैठक म्हणजे येणाऱ्या विधानसभेची चाचपणी आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याने आपली ताकद दाखवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या समीक्षा बैठकीस उपस्थित राहावे असे आव्हान मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी केले आहे.

error: Content is protected !!