कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली तर कळंब-धाराशिव मतदार संघाचा विकसीत मतदार संघ म्हणून नावारूपास आणण्यासाठी रात्रीचा दिवस करेन असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी प्लॉट वाटप् आदेश देते वेळेस व्यापाऱ्यांना आवाहन केले. कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंबचे उपबाजार शिराढोण सुरू करण्या करीता अनेक वर्षापासून शेतकरी वर्गाची मागणी होती.१९८३ साली बाजार समितीला गायरान मधून ७ एकर जमीन अधिगृहन करून हस्तांतर करून दिली होती.हस्तांतर केलेल्या जागेचा शासनाकडून मंजूर ले-आऊट झालेला होता परंतू त्याचा स्वतंत्र ७/१२ ही आजतागायत बाजार समितीस प्राप्त नव्हता.बाजार समितीवर सभापती पदाचा पदभार घेतल्या पासून बाजार समितीस नावारूपास आणण्या करीता अनेक शेतकरी उपयुक्त अशी विकास कामे केली आहेत. शिराढोण उपबाजार सुरू करण्याकरीता प्राधान्याने हातावर घेवून पणन संचालक म.रा.पूणे यांच्या कार्यालयाच्या मान्यतेने व्यापारी वर्गांना शेतीपूरक व्यवसाय करण्या करीता प्लॉट वाटपा बाबत मान्यता घेवून प्लॉट वाटपा बाबत जाहीर लिलाव करून वरीष्ठ कार्यालयाच्या मान्यतेने लिलावात भाग घेवून प्लॉट विजेत्या व प्लॉट अनामत रक्कम भरणा करणाऱ्या प्लॉट धारकास प्लॉट चे वाटप करण्यात आले.बाजार समितीच्या इतीहासात प्रथमच जाहीर लिलावाने व अनामती घेवून प्लॉट चे वाटप करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी सभापती शिवाजी कापसे,उपसभापती श्रीधर भवर व संचालक मंडळ यांचे आभार मानले. वाटप केलेल्या प्लॉट धारकांनी पुढील ६ महिन्यात बांधकाम करून व्यवसाय करणे बंधनकारक आहे असा ईशाराही त्यांनी दिला बाजार समिती सुरू होवून तेथील शेतकऱ्यांना आपला शेतमाल हक्काच्या बाजार समितीत विकता यावा. या करीता आवश्यक सोई सुविधा,रस्ते,गोदाम,बोअरवेल चे पाणी यापूर्वी दिलेले आहेत.लिलाव ओटा शॉपिंग सेंटर,यांच्या मान्यता प्राप्त आहेत.लवकरच गाळ्याचे लिलाव घेवून बाजारपेठ सुरू होणार आहे.बाजार पेठ सुरू करण्यासाठी दिवसरात्र काम केले. यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक व व्यापाऱ्यांची उपस्थित होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले