August 9, 2025

संसाराचा गाडा हाकण्यास,सक्षम आर्थिक बळ देण्यास महत्वाची… महिलांतून समाधानासह उमतेय प्रतिक्रिया

  • धाराशिव (जिमाका)- महिला आणि मुलींना स्वावलंबी,आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.या योजनेतील लाभार्थ्यांना 14 ऑगस्टपासून सुरुवातीचे दोन हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
  • आपल्या खात्यावर पैसे आल्याचे पाहून जिल्हयातील महिला समाधानी व आनंदी झाल्या आहेत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासह सक्षम आर्थिक बळ देण्याचे काम करणार असल्याच्या प्रतिक्रिया महिलांमध्ये उमटताना दिसत आहेत. रक्षाबंधनाची ओळवणीच भाऊरायाने बहीणीस दिल्याने अनेक बहिणींनी हृदयात साठवून ठेवलेल्या समाधानाच्या हुंदक्यास त्यांनी वाट मोकळी करुन देत आपल्या शब्दात राज्य सरकारचे मनापासून आभार मानले आहेत.
  • *अन पैसे खात्यात जमा होताच विश्वास दृढ झाला…*
  • आता आर्थिक सक्षम मदत होणार
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्याची माहिती झाली. योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करुन प्रशासनाकडे अर्ज दाखल केला.काही दिवसानंतर अर्ज पात्र ठरल्याचा संदेश आला.मात्र,अर्ज पात्र ठरुनही योजनेबाबत अनेक गैरसमज समाजात चर्चिले जात होते.देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले,मात्र खऱ्या अर्थाने स्त्रीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 14 ऑगस्ट रोजी लाभाचे 3 हजार रुपये आधारसंलग्न केलेल्या खात्यावर जमा झाल्याने आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे.यामुळे योजनेबाबतचा विश्वास आणखीनच दृढ झाला.तसेच ती सकाळ माझ्यासाठी आर्थिक सक्षमतेकडे जाणारी ठरली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आता मला आर्थिक गरजेसाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
  • सौ.संघमित्रा दत्तात्रय अंकुशराव
    मु.पो.बामणी ता.जि.धाराशिव
error: Content is protected !!