August 9, 2025

छत्रपती संभाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • जवळा (खुर्द) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जवळा (खुर्द) छत्रपती संभाजी विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
    यावेळी ध्वजारोहण मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
    याप्रसंगी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करून स्वांतत्र्यविरांच्या आठवणीना उजाळा दिला.
    प्रस्ताविक सहशिक्षक धनंजय डोळस यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विषय प्रमुख सहशिक्षक अशोक सावंत यांनी केले.कार्यक्रमासाठी सूर्यकांत लोहार, श्रीकांत तांबारे, पृथ्वीराज लोमटे तसेच उस्मान भाई शेख यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!