धाराशिव (जिमाका) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.या योजनेसाठी पात्र असलेली कोणतीही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांच्या माध्यमातून काम करीत आहे.योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलेला दर महिन्याला १५०० रुपये त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लक्ष २४ हजारपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट दिले आहे.पात्र लाभार्थी महिलेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. १६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १ लक्ष ७९ हजार ९११ महिलांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज नारीशक्ती अँपवर केले आहे.१लक्ष २८ हजार ८१७ अर्ज संकेतस्थळावर प्राप्त झाले आहे.असे एकूण ३ लक्ष ८ हजार ७२८ प्राप्त झाले आहे. प्राप्त अर्जापैकी १ लक्ष ७४ हजार ३४१ महिलांच्या अर्जांना नारीशक्ती अँपवर मान्यता दिली आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी