August 9, 2025

ज्ञान प्रसार मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
    याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मोहा गावातून विद्यार्थ्यांची जनजागृतीपर फेरी काढण्यात आली.या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषणा देत जनजागृती केली.ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.सरपंच सौ.सीमा संदीप मडके यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके यांची या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला.कार्यक्रमाला सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!