August 10, 2025

1 सप्टेंबरपासून होणार 21 वी पशुगणना

  • धाराशिव (जिमाका)- पशुपालनास चालना देण्यासाठी व पशुधनविषयक कार्यक्रमांच्या आर्थिक व भौतिक नियोजन आराखडे आणि अंदाजपत्रके तयार करण्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना कार्यक्रम राबविण्यात येतो.आतापर्यंत 20 पशुगणना कार्यक्रम राबविण्यात आले.
    जिल्हयात 01 सप्टेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत 21 वी पशुगणना सन 2024 कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.पशुगणना कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातून शहरी व नागरी विभाग मिळून 111 प्रगणक आणि 26 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पशुगणना कार्यक्रमाकरीता मोबाईल अँपचा वापर होणार आहे.जिल्हयात पशुगणना कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा 25 जुलै रोजी यशदा पुणे येथे घेण्यात आली.याच कालावधीत धाराशिव जिल्ह्यात ही पशुगणना कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकरी-पशुपालकांनी पशुधनाची माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
error: Content is protected !!