August 9, 2025

पालकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे – संचालक राजेश्वर बुके

  • लातूर – आजच्या आधुनिक काळामध्ये पालकानी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण दिले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची यशस्वी अमलबजावणी होईल असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक राजेश्वर बुके यांनी केले आहे.
    महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला व वाणिज्य शाखेचा विद्यार्थी-शिक्षक-पालक सुसंवाद मेळावा संपन्न झाला यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर संस्थेचे संचालक बस्वराज (राजू) येरटे, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, कला शाखा समन्वयक प्रा. रवींद्र सोनोणे, प्रा. विश्वनाथ स्वामी, वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. कल्पना गिराम, डॉ. घनश्याम ताडेवार आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाची सुरुवात जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. सरस्वती बोरगावकार व विद्यार्थिनीनी स्वागत गीत व भक्ति गीत सादर केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्याचा पालकांसह सत्कार करण्यात आला.
    पुढे बोलताना राजेश्वर बुके म्हणाले की, विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी वेळेचे नियोजन केले पाहिजे. महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आजही महाराष्ट्रातील प्रमुख महाविद्यालयांपैकी एक आहे. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांशी पाईक राहून आम्ही सर्व कार्य करतो. आज शिक्षणाचे बाजारीकरण झालेले आहे. आमचे महाविद्यालय हे नामांकित महाविद्यालय आहे. महाविद्यालयाचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्य करीत आहोत. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत जे लहानपणीच केले जातात.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे म्हणाले की, शिक्षणातील अभ्यासक्रमाच्या अभ्यासासोबतच दैनंदिन जीवनातील विविध कामकाजासाठीचे वेळेचे नियोजन महत्वाचे ठरते. पालकानी आपल्या मुला मुलीच्या दैनंदिन गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
    यावेळी कला शाखेची माहिती प्रा रवींद्र सोनोने यांनी तर वाणिज्य शाखेची माहिती प्रा. कल्पना गिराम यांनी दिली.
    यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय पवार म्हणाले की, विद्यार्थी-शिक्षक-पालक असा त्रिकोण आपल्याला समतोलपणे साधता आला पाहिजे तरच सुसंवाद निर्माण होईल. प्रवेशासोबत पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वेळ दिला पाहिजे असे म्हणाले.
    यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी नवोदित विद्यार्थी आणि पालकांचे महाविद्यालयाच्यावतीने स्वागत करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अश्विनी रोडे, प्रा शितल झुंजे यांनी केले तर आभार डॉ घनश्याम यांनी मानले.
    या कार्यक्रमांमध्ये कला व वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ बोडके, बालाजी डावकरे, आनंद खोपे, सय्यद जलील, शुभम बिराजदार, संतोष राठोड यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!