August 8, 2025

विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्नशील असावे – आर.के. राजेभोसले

  • कळंब (विशाल पवार ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शहरातील विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विधीज्ञ मंडळ कळंब तसेच विद्याभवन हायस्कूल कळंब यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन (२६जून) निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व बालकांचे अधिकार याविषयी जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित विधी साक्षरता शिबीरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आर.के.राजेभोसले जिल्हा न्यायाधीश-१ तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब यांनी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या आहारी न जाता भविष्यासाठी स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
    सदरील कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषण करताना जिल्हा न्यायाधीश कळंब आर.के. राजेभोसले यांनी उपस्थित विद्यार्थ्याना बालकांच्या विविध अधिकाराबाबत माहिती दिली. तसेच सध्याच्या युगात सोशल मिडीयाचा होत असलेला अतिप्रमाणातील वापर व त्यातूनच वाढत असलेल्या विविध गुन्हेगारी प्रवृत्तींबाबत माहिती देताना विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच लहान वयापासूनच चांगले काय आणि वाईट काय याविषयी विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे आणि अपप्रवृत्तीपासून स्वतःला दूर ठेवावे. तसेच अंमली पदार्थांमुळे मिळणारे सुख हे क्षणभंगुर असल्याने विद्यार्थ्यांना त्याच्या आहारी जाऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना जागरूक करणे ही काळाजी गरज झाली आहे, असे प्रतिपादन शिबीराच्या माध्यमातून केले.
    सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर. के. राजेभोसले जिल्हा न्यायाधीश-१ तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभवन प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एस.पवार हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कळंब न्यायालय येथील कनिष्ठ लिपीक आय.ए.मुल्ला, शिपाई एस. पी. भांडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस.एस.तीर्थकर यांनी तर आभार प्रदर्शन एस.जे. पवार यांनी केले.
error: Content is protected !!