कळंब – तालुक्यांतील घारगाव येथील हनुमान विद्यालयातील शिक्षक रमेश कोंडीबा लोकरे व शिवाजी नरसिंगे यांचा सेवापुर्ती निमित्त भव्य सत्कार समारंभ व गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए . बी.जाधवर हे होते. यावेळी प्रमुख अतिथी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणजी नेहरकर, सरपंच हिम्मत साळुंके, साई कॉलेजचे प्राचार्य जगदीश गवळी,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,माजी मुख्याध्यापक ए. बी. कुंभकर्ण, अर्जुंसिंग ठाक डी.बी. माने, डी. के. कुलकर्णी, आदी उपस्थीत होते. यावेळी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. गवळी, डी के. कुलकर्णीं, यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राचार्य महादेव गपाट यांनी केले तर आभार कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले