August 9, 2025

शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांना अग्रलेख संग्रह सप्रेम भेट

  • लातूर (दिलीप आदमाने) – न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होणारे सा.साक्षी पावन ज्योतचा विशेषांक व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके लिखित विरंगुळा अर्थात अग्रलेख व पथनाट्यांचा संग्रह असलेले पुस्तक संभाजी नगर विभागातील लोकप्रिय कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार विक्रम (बप्पा) काळे यांना दि.२२ जून २०२४ रोजी लातूर येथील शंकरराव काळे अध्यापक विद्यालयात कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते देण्यात आले.
    याप्रसंगी श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालय तुळजापूर येथील प्रा.अरुण चौधरी व प्रा.उल्हास झालटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
error: Content is protected !!