August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयामध्ये योगा दिन साजरा

  • कळंब – आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त दि.२१ जून २०२४ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कुलमधील एनसीसी विभागाच्या वतीने एकदिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
    या योग प्रशिक्षण शिबिरास योग गुरु ॲड.एस.एम.कुलकर्णी यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले.व तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले. या शिबिरामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पवार, उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,डॉ. ज्ञानेश चिंते, डॉ.साहेबराव बोंदर, डॉ.दीपक सूर्यवंशी,डॉ.दत्ता साकोळे,डॉ.संदीप महाजन, डॉ. नामानंद साठे,डॉ.राघवेंद्र ताटीपामूल,प्रा.विलास अडसूळ,प्रा.शेळके,प्रा.संदीप देवकते ,प्रा.आप्पासाहेब मिटकरी, मारुती केचे,विनोद खरात,चांगदेव खंदारे, दत्तात्रय गावडे, व तसेच एनसीसी विभागातील विद्यार्थी व विध्यार्थीनी,आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी एनसीसी विभाग प्रमुख लेफ्ट.डॉ. के.डब्लू.पावडे,लेफ्ट.सरस्वती वायाबसे,थर्ड ऑफिसर अप्पासाहेब वाघमोडे,अधीक्षक हनुमंत जाधव आदीने परिश्रम घेतले.
error: Content is protected !!