कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिबिराचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य पठाण जे.एन. यांनी केले.यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे,सहशिक्षक परमेश्वर मोरे,प्रतिभा गांगर्डे यांनी योगशिक्षक म्हणून कामगिरी बजावली. यामध्ये सूक्ष्म व्यायाम प्रकार, सूर्यनमस्कार, जॉगिंग, अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका आदी योगासने, प्राणायाम घेण्यात आली. योग शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे ज्ञानेश्वर तोडकर, जीवन सिंहठाकुर, शंकर गोंदकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले