August 9, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे MHT-CET परीक्षेत यश

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एमएचटी-सीईटी परीक्षेतील यशामुळे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ. अशोकरावजी मोहेकर,संस्थेच्या संचालिका सौ. अंजलीताई मोहेकर,महाविद्यालयाचे उपप्राचार्य पंडित पवार, मिटकरी,प्रा.बोंदर आणि प्रा. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    2024 मध्ये घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत कु.कुलकर्णी समृद्धी (91.43 पीसीएम ग्रुप ),नळे प्रणव (91.11 पीसीबी ग्रुप,95.72 एमएच बीएस्सी नर्सिंग ग्रुप) ,अक्षय मुंडे (90.83 पीसीएम ग्रुप) आणि कु.मिटकरी सिद्धी (81 पीसीबी ग्रुप) गुण घेऊन महाविद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.लोमटे,प्रा.मोरे, प्रा. भिसे, प्रा.महेश मडके,प्रा. अभिजित बोबडे,खंडागळे मॅडम, आडसुळ मॅडम, पाटील मॅडम, वैद्य मॅडम आणि कांबळे मॅडम उपस्थित होत्या. तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.अरविंद शिंदे,प्रा.किरण बारकुल आणि संदीप सूर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले.
error: Content is protected !!