August 9, 2025

शौर्य शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांनी पराभव पचवायला शिकविले – प्रा.व्यंकट दुडिले

  • लातूर – महाराणा प्रताप सिंह यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विविध लढाया केल्या. यामध्ये त्यांना सतत विजय प्राप्त झाला. मात्र कधी कधी पराजयाला सुद्धा सामोरे जावे लागले. अशावेळी ते पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने त्यांनी अनेक लढाया जिंकून प्रजेला पराभव पचवायला शिकविले, असे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रा. व्यंकट दुडिले यांनी केले.
    श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महाराष्ट्र शासन, जयंती उत्सव समिती, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (व्यवसाय शिक्षण विभाग), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती प्राचार्य कक्षामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, प्रा. श्रीनंद पाटील, डॉ. गुणवंत बिरादार, प्रा. रवींद्र सोनोने, प्रा. दयानंद टेंकाळे, प्रा. टी. घनश्याम यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    पुढे बोलताना प्रा. व्यंकट दुडिले म्हणाले की, मेवाडची राजधानी चितोड ही महाराणा प्रतापांची मुख्य राजधानी होती. महाराणा प्रतापांना असे वाटत होते की, आपण अकबरा सारखा राज्यकारभार करावा. मारवाडचा राजा चंद्रसिंग यांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. महाराणा प्रताप यांची कार्य करण्याची शैली ही समाजाभिमुख होती. ते एक उत्कृष्ट लेखक सुद्धा होते. त्यांनी विश्ववल्लभ व व्यवहार संस्कृती असे दोन ग्रंथ लिहिले. हा आदर्श आपण सर्वानी घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव म्हणाले की, आपल्या महाविद्यालयात आज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती आपल्या सर्वांच्या उपस्थीतीत संपन्न होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित येतो. महापुरुषाच्या विचाराचे वाचन केले जाते यामुळे आपल्या सर्वाना एक नवी ऊर्जा मिळते, असे ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, महाराणा प्रताप सिंह यांनी लढायामध्ये व्यस्त असतानाही दोन ग्रंथाचे लिखाण केले यावरून ते लढव्यय्ये राज्यकर्त्या सोबत उत्कृष्ट लेखकही होते, असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किसनाथ कुडके यांनी केले, तर आभार प्रा. देविदास वसावे यांनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव घंटे, श्रीशैल्य पाटील, राम पाटील, माकने योगिराज, नंदू काजापुरे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!