परंडा – तालुक्यातील सिरसावचे रहिवाशी नागनाथ महादेव चोबे यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. चोबे यांना शिवाजी विद्यापीठाच्या मानवी शास्त्र विद्याशाखे अंतर्गत राज्यशास्त्र विषयातील पीएचडी ७ जून रोजी जाहीर करण्यात आली. त्यांनी प्रचार्य डॉ. शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ महाराष्ट्रातील भूमिपुत्राचे राजकारण: विशेष संदर्भ मुंबई’ या विषयावर सविस्तर मांडणी करत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शोध प्रबंध सादर केल. चोबे हे सध्या आर्ट अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
More Stories
सख्ख्या भावांची कमाल! महाराष्ट्र केसरी 2026 मध्ये रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा झेंडा उंचावला
जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा क्रांती अकॅडमीकडून जंगी सत्कार;विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी नवी संधी,नवी स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्य घडवणारा – डॉ. सतीश कदम