August 9, 2025

मागासवर्ग आयोगाचे सदस्य 12 व 13 जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर*

धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ. गोविंद काळे,प्रा मच्छिंद्रनाथ तांबे व डॉ.मारुती शिकारे हे 12 व 13 जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 12 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे आगमन व मुक्काम. 13 जून रोजी सकाळी 9 वाजता उमरगा तालुक्यातील उमरगा शहर व चिंचकोट येथे क्षेत्र पाहणी, सकाळी 10:30 वाजता लोहारा तालुक्यातील फणेपुर व बेलवाडी येथे क्षेत्र पाहणी, दुपारी 1.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन. दुपारी 2.30 वाजता भोजन.दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथील सभागृहात 1 जून 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत इतर मागासवर्ग,विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती या संवर्गास वितरित केलेली जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे याबाबतचा आढावा घेतील.तसेच जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अखत्यारीतील आश्रमशाळांचा देखील आढावा घेतील. सायंकाळी 5 वाजता धाराशिव येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण करतील.

error: Content is protected !!