धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्र राज्य शौक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने जाहीर केलेल्या अभ्यासक्रम आराखडयात मनाचे श्लोक,भगवतगीता, मनुस्मृतीचे श्लोक, घुसडण्याच्या सुचना दिल्याचे प्रसार माध्यमातून ज्ञात झाले आहे. याचा धाराशिव जिल्हयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी पुरोगामी स्त्री-पुरुष जनतेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. असे प्रकार थांबविण्यासाठी राज्यपाल महोदयांना निवेदन उपजिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे देण्यात आले. ज्या मनुस्मृतीत ब्राम्हणेत्तर, अस्पृश्य समाज, स्त्री वर्गाची विटंबना करण्यात आली आहे. तो मनुस्मृती गंथ भारताचे प्रकांड पंडित थोर समाजसुधारक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1927 साली महाडच्या चवदार तळयाच्या सत्याग्रह प्रसंगी जाहिर दहन केले होते. त्या चातुवण्र्य पुरस्कृत मनुस्मृतीचे उच्चाटन करुन स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या अखिल मानव समुहाचे धारण करणाज्या तत्त्वावर भारतीय संविधाराची उभारणी केली आहे ते पवित्र संविधान जुन्या रुढी व परंपरावादी अंधश्रध्दा महाराष्ट्र शासनाच्या शालेय अभ्यासक्रमात घुसडून कलंकीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्टसंत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील शालेय विद्याथ्र्यांच्या हातात विज्ञाननिष्ठ शौक्षणिक सात्यि देण्याऐवजी अंधश्रध्दा, रुढी, परंपरा अधारीत समाज व्यवस्था उध्दस्त करणाज्या दंतकथा आधारित पुस्तके देत आहेत, याचा आम्ही तीव्र निषेध करता. महाराष्ट्र शासनाने सबब भगवतगीता, मनाचे श्लोक, मनुस्मृती संदर्भ यांना शालेय अभ्यासक्रमात स्थान देण्याचा निर्णय रद्द करणे बाबत आदेशीत / निर्देशीत करावे व त्याऐवजी जगाला ज्ञान देणाज्या भगवान गौतमबुध्द, संतकबीर, संत तुकाराम महाराज, महात्मा फुले यांचे अखंड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता, संत गाडगेबाबा यांचे विचार यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा. महाराष्ट्रातील विद्याथ्र्यांना अंधश्रध्दा, रुढी, पंरपरेकडे अंधाराकडे घेऊन जाणारा हा निर्णय रद्द केला नाही तर मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले. निवेदन देताना कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघटनेचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासचिव हरीभाऊ बनसोडे, युवा भिम सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष महादेव भोसले, संबोधी ग्रुपचे धनराज नाईकवाडे, रिपाई खरात गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष संपत सरवदे, साहित्यिक विजय गायकवाड, युवा भिम सेने तालुकाध्यक्ष अजित कदम सर, जेष्ठ नागरीक यशवंत पेठे, सत्यशोधक सामाजिक चळवळीचे अरुण माने, आर.पी.आय. आठवले गटाचे भालचंद्र कठारे, गुरुकुल कोचिंक क्लासचे संचालक इंजि. राहूल जगताप, लहू खंडागळे अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अजय वाघाळे इत्यादी उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला