कळंब – नगर परिषदकडे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी माहिती अधिकार अर्ज दाखल करुण नगर परिषदेत एकुण असलेले विभाग व त्याविभागांचे जन माहिती अधिकारी कोण आहेत याविषयी माहिती मागीतली होती. त्यावर नगर परिषदेत एकुण ३० विभाग असून त्यासर्व विभागांची नावे तसेच जन माहिती अधिकाऱ्यांची नावे व पदनाम याची माहिती नगर परिषदेने राहुल मुळे यांना दिली. परंतू नगर परिषदेच्या ३० विभागा पैकी १० विभागांचे कामकाज चक्क शिपाई, सफाई मजूर व मुकदम हे पाहत असल्याची धक्कादायक माहिती उघडकिस आली होती. याविषयी राहुल मुळे यांनी जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार केली तक्रारीत म्हटले होते कि, महाराष्ट्र शासनाने १ फेब्रुवारी २०१७ ला परिपत्रक काढून कामाचा पुरेसा अनुभव व दर्जा असणाऱ्या योग्य वरिष्ठतेच्या अधिकाऱ्यांची जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी असे आदेश दिलेले असल्याने कळंब नगर परिषद मुख्याधिकारी यांनी शिपाई, सफाई मजूर व मुकदम यासारख्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना जनमाहिती अधिकारी म्हणून केलेल्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने राहुल मुळे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन कळंब नगर परिषदेला तात्काळ नियमानुसार कार्यवाही करुण केलेल्या कार्यवाही बाबत तक्रारदार यांना कळवून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावे असे कळंब नगर परिषदेला आदेशीत केले होते. त्यावर कळंब नगर परिषद मुख्याधिकारी यांनी जन माहिती अधिकारी पदाचे सुधारीत आदेश काढून शिपाई, सफाई मजूर व मुकदम यांच्याकडे १० विभागांचा जन माहिती अधिकारी म्हणून असलेला पदभार काढून त्या पदावर सुधारीत आदेश काढून नवीन नियुक्त्या कराव्या लागल्या. कळंब नगर परिषदेने डिसेंबर मध्ये काढलेल्या नियुक्ती आदेशाला सहा महिने पुर्ण होण्या अगोदरच सुधारीत आदेश काढून तोंडघशी पडावे लागले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले