धाराशिव (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषीत केला आहे.त्यानुषंगाने ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ७ मे २०२४ रोजी मतदान झाले.सर्व विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम – व्हीव्ही पॅट मशीन्स शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ४ जुन २०२४ रोजी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे मतमोजणी होणार आहे.४ जुन, २०२४ रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणी होणार आहे.मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी (Election Agent) व गणना प्रतिनिधी (Counting Agent) यांना मोबाईल (भ्रमनध्वनी) किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेवून येण्यास सक्त मनाई आहे. ४० उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी (Election Agent) व गणना प्रतिनिधी (Counting Agent) यांनी याची नोंद घ्यावी.असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला