August 9, 2025

शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी मोफत खते बियाणे वाटपाची मागणी

  • उमरगा – मागील वर्षाच्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पावसाने पार दांडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थिती उपाययोजना जाहीर केल्या आहेत. खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न घेता आलं नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे लागवडीसाठी व खते मोफत उपलब्ध करून द्यावित शेतकऱ्याची होणारी हाल अपेष्टा पहावत नाही.जो दूध उत्पादक शेतकरी आहे. त्याला शासनाने जाहीर केलेल 5 रुपये अनुदान अजूनही दिलं नाही. ते देण्यात यावे. व दुधाची दरवाढ पण करण्यात यावी सध्या 3.5, व 8.5 या गुणवत्तेला 28 रुपये दर दिला जात आहे .
    तर शासनाने 3.5, व 8.5 या गुणवंतेला 35 ते 40 रुपये दर देण्यात यावा.
    खरीप हंगाम जून 2024 ला जेव्हा पेरण्या सुरू होतील तेव्हा पेरणी पूर्वी मोफत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत.यातून शेतकऱ्यांना आपली मदत होईल. आणि उत्पन्न घेणे सोयीचे होईल. अशा मागणीचे पत्र उमरगा जिल्हा धाराशिवे येथील तहसीलदार येरमे यांना देण्यात आले. यावेळी तिन्ही संघटनेतील विविध पदाधिकारी, तालुक्यातील शेतकरी विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
    मराठा सेवा संघाचे जिल्हा मार्गदर्शक शांत कुमार मोरे, समाज सेवक भूमिपुत्र वाघ,काशिनाथ पाटील , लक्ष्मण शिंदे,रेखाताई पवार जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव,तालुका अध्यक्ष सत्यवती इंगळे, तालुका उपाध्यक्ष साधना पवार, सचिव ज्योती राजपूत, निर्मला देशमुख सदस्य,. ई उपस्थितीमध्ये तहसीलदारांना पत्र दिले त्यानंतर प्रत्येकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी काशिनाथ पाटील पेठसांगवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!