August 9, 2025

परिस्थितीची जाणीव व अभ्यासाचे सातत्य यामुळे मिळाले यश – दत्तात्रय लांडगे

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – दत्तात्रय लांडगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती मिळाल्यानंतर धाराशिव जिल्हा परिषद मध्ये उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक ) पदभार स्वीकारलेला होता परंतु शिक्षण अधिकारी (मां.) सुधा साळुंखे या रजेवर गेल्यामुळे
    प्रभारी शिक्षणाधिकारी या पदाचा पदभार त्यांच्याकडे 22 मे रोजी आला आहे.
    याबद्दल दिनांक 23 मे रोजी त्यांचा कळंब येथे मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2017 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा या संवर्गातून असलेले दत्तात्रय शिवाजी लांडगे यांची उपशिक्षणाधिकारी गट ब या पदावर निवड झाली होती. त्यांचे मित्र चिमने यांनी पनवेल येथे शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी बोलताना दत्तात्रय लांडगे यांचे वडील जिल्हा परिषद शिक्षण विभागात सेवक म्हणून काम करीत होते. या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासाचे सातत्य ठेवून स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे.पत्नी कळंब येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 1 येथे उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी दत्तात्रय लांडगे यांनी नेकनूर येथील अध्यापक विद्यालयात उपप्राचार्य म्हणून सेवा केली आहे. त्यांचे हे यश उत्तुंग व आदर्श घेण्याजोगे आहे. असे सांगून त्यांचे अभिनंदन केले व त्यांचा शाल ,बुके देऊ मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, डॉ.अशोक शिंपले, ह.भ.प महादेव महाराज अडसूळ, सहशिक्षक नारायण लोकरे , श्यामसुंदर पाटील , सतीश मडके , ऋतुराजे महिला ग्रामीण बँकेचे चेअरमन उद्धव गपाट ,पत्रकार संभाजी गिड्डे , प्रदिप यादव,माधवसिंग राजपुत तसेच सर्व मित्रपरिवार, शिक्षक बांधवांनी व कुटूंबीय यांनी सत्कार केला.
error: Content is protected !!