March 26, 2026

इंदिरा नगर येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – जगाला अहिंसेचा,प्रेम व शांतीचा मार्ग दाखविणारे बौद्ध धम्माचे संस्थापक महाकरूनिक तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंतीनिमित्त दि.२३ मे २०२४ रोजी शहरातील इंदिरा नगर मधील मुख्य चौकात तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती,मेणबत्ती प्रज्वलीत करून सामुदायिक रित्या त्रिसरण पंचशील म्हणून अभिवादन करण्यात आले.
    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु.भास्कर सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
    याप्रसंगी माजी नगरसेवक आयु.डॉ.सुनिल गायकवाड,आयु.शंकर वाघमारे,आयु.शिवाजी सिरसट,आयु.राजाभाऊ गायकवाड,आयु.किशोर वाघमारे,आयु.सचिन तिरकर,आयु.आकाश वाघमारे,आयु.प्रमोद ताटे,आयु.प्रा.आविनाश घोडके,
    आयु.माणिक गायकवाड,आयु.विलास इंगळे,आयु.ऋतिक पट्टेकर,आयु.बाबासाहेब वाघमारे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!