August 9, 2025

कळंबमध्ये जबरी दरोडा

  • कळंब (महेश फाटक ) – शहरात दरोड्याची मालिका कायम असून,व्यापाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास कळंब येथील लक्ष्मी रोडवर ब्रिजलाल मुंदडा यांच्या श्री गणेश ट्रेडर्स कंपनी या दुकानावर दरोडा पडला. विशेष म्हणजे दुकानाचे शटर गॅस कटरने कापून आठ चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला चढवला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. व्यापारी आणि पोलिसांच्या प्रयत्नातून ३ आरोपींना पकडण्यात आले आहे.
    रात्री दोन ते साडेतीनच्या आसपास चोरीच्या उद्देशाने शटर कापून सात ते आठ दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. दरोडेखोरांनी एक लाख रुपये, सोने -चांदीचे दागिने चोरी केले. त्यांनी लोखंडी रॉड व दगड याचा हत्यार म्हणून वापर केला.चोरट्यांनी सीसीटीव्हीचीही तोडफोड केली.चोरटे व व्यापारी यांच्यात झटापट झाली. मात्र, काही अनुचित प्रकार घडला नाही.पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने सुरू केली आहेत. यातील ३ आरोपींना पकडण्यात यश आल्यामुळे उर्वरीत फरार आरोपींना लवकरात लवकर पकडणे शक्य होईल.
    पुढील कार्यवाहीसाठी धाराशिव येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी माहिती दिली.
error: Content is protected !!