August 9, 2025

छावा संघटनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी सचिन बागल

  • धाराशिव (नेताजी जावीर ) – अखिल भारतीय छावा संघटनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी सचिन बागल यांची निवड करण्यात आली आहे. छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र बागल यांना देण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे जिल्हा सचिव ज्योतिराम काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष रवी साळुंके, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे सदस्य बालाजी सातपुते यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!