लातूर – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूरचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांनी विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड येथील शिक्षण सहसंचाल डॉ. किरणकुमार बोंदर यांचा शाल, महात्मा बसवेश्वर प्रतिमा, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले,डॉ.दीपक चाटे आणि संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाची स्थापना सं १९७० ला झाली असून आज ५४ वर्ष झालेले आहे. हे महाविद्यालय मराठवाड्यातील कला,वाणिज्य, विज्ञान,व्होकेशनल,समाजकार्य आणि बीसीए अशा एकूण सहा शाखा चालवणारे आहे. समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि गणित असे एकूण सहा पदव्युत्तर विभाग असून तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि भूगोल या विषयाचे संशोधन केंद्रे आहे. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांमध्ये स्थापनेपासून ते आजतागायत महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला, असा मी घडलो…. प्रबोधनपर कार्यक्रम अशा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्रीडा, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशाचा एक उत्कृष्ट नागरिक बनविण्याचा प्रयत्न केला जातो असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना डॉ. किरणकुमार बोंदर म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे मराठवाड्यातील शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असलेले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला नॅकने अ दर्जा प्रदान केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रित असून यामध्ये विद्यार्थ्याला अधिकाधिक कौशल्ययुक्त निर्माण करून त्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धोरणामध्ये सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाला अधिक महत्त्व दिले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश मोदी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश