August 9, 2025

शिराढोण येथे लांबच्या पल्ल्यासाठी बसची मागणी !

  • शिराढोण – कळंब तालुक्यातील शिराढोण येथे लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याबाबत निवेदन दिले. निवेदक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कळंब तालुका उपाध्यक्ष आकाश पवार यांनी दिनांक १४ मे २०२४ रोजी शिराढोण बस स्थानक येथील वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर शिराढोण परिसरामध्ये लगबग ४८ खेड्यांनी व्यापलेलं असं हे शिराढोण गाव, कळंब तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठी बाजारपेठ असलेले हे शिराढोण गाव या गावांमध्ये प्रवाशांचं दळणवळण करण्यासाठी वाहतुकीची कमतरता भासत आहे. सदरील या गावांमध्ये चार ते पाच शाळा, दोन कॉलेजेस, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, या गावांमध्ये मोठी बाजारपेठ असल्यामुळे दोन नॅशनलाईज बँक सुद्धा या गावांमध्ये उपस्थित आहेत. तरीसुद्धा या गावांमध्ये येण्या – जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रवासी, विद्यार्थी, वृद्ध नागरिक, यांना दळणवळण करण्यासाठी वाहतुकीची सोय होत नाही. शिराढोण या बस स्थानकामध्ये वाहतूक नियंत्रक पी.सी.शिंदे साहेब यांच्याशी यांना निवेदन देऊन उपस्थित मान्यवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष आकाश पवार, निलेश संगवे, उन्मेश संगवे, महेश पवार, ताजखा पठाण, मोहसीन खतीब, सलमान(बडे) शेख, अमोल पाटील,अर्जुन पवार, गोविंद म्हेत्रे, राजेश वाघमारे,शिवचरण राठोड या सर्वांनी या निवेदनासाठी उपस्थिती देऊन शिराढोणकरांच्या प्रवासासाठी चांगल्या पद्धतीची कामगिरी करीत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
  • बस स्थानकावर न जाता थेट पलायन
  • कळंब – लातूर साडेआठच्या टायमिंग नंतरची येणारी बस ही बस स्थानकावर न येता थेट बायपास रोडने लातूरला रवाना होते, व शिराढोण मध्ये येणारे प्रवासी थेट बायपासला थांबवले जातात.
  • – उन्मेश संगवे,(व्यापारी) शिराढोण प्रवासी
  • बसच्या शटल सेवांचे भान नाही
  • बस स्थानकावर येणाऱ्या सर्व बस अशा जाणाऱ्या अवेळी येऊन प्रवाशांची वाट न पाहता थेट निघून जातात.
  • – राजेश वाघमारे,शिराढोण प्रवासी
error: Content is protected !!