August 9, 2025

छत्रपती संभाजी राजे यांची जयंती उत्साहात साजरी

  • कळंब (महेश फाटक ) – १४ मे रोजी कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व फटाक्यांची आतिषबाजी करत महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे इंजि.प्रकाश धस,प्रदेशाध्यक्ष अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष अँड.तानाजी चौधरी,अँड.अशोक चोंदे.तालुकाध्यक्ष दत्ता कवडे. प्रा. जगदीश गवळी. प्रा.अरविंद शिंदे. संदीप शेंडगे,युवराज नकाते, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रा.अनिल फाटक, विलास गुंठाळ,व्यापारी अशोक शिंदे,यश सुराणा व इतर मान्यवर उपस्थित होते.
    तसेच कळम शहरातील शेरे गल्ली येथून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सावरकर चौक. होळकर चौक. छत्रपती शिवाजी महाराज चौक. साठे चौक. जिजाऊ चौक. मार्गे संभाजी चौक येथे पोहोचली यावेळी तरुणांनी डीजेच्या तालावर नाचत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे घोषणा देत उत्साहात जयंती पार पाडली.
error: Content is protected !!