August 9, 2025

भारत जोडो अभियानाची जागरुकता, बोगस मतांची दाखवली तत्परता..!

  • वर्धा (साक्षी पावन ज्योत वृत्तसेवा ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी पार पडले.
    वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात नाचणगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १४५ वर सकाळी ७.०० वाजता भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते प्रत्युष (बाबा) श्रीवास्तव मतदान करण्यास गेले असता ईव्हीएम मशीनवरील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावापुढील चिन्हा समोरचे बटन दाबले असता व्हि व्ही पॅट मधील पेटीत त्या चिन्हाची चिट्ठी पडली नाही. त्यांनी मतदान प्रक्रिया थांबवल्यानंतर मशीन व्यवस्थित सेट केली गेली आणि पुन्हा अर्ध्या तासानी मशीन सुरळीत झाली तेंव्हा मशीनमध्ये ५१ मतांची नोंद दाखवण्यात आली. प्रत्युष (बाबा) श्रीवास्तव च्या अगोदर केवळ ७ मते नोंदवली गेली असतानी सुद्धा मशीनमध्ये ५१ मतांची नोंद कशी झाली. याचा अर्थ मतदानात हेराफेरी होत असल्याचे उघड झाले असल्याचे भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते प्रत्युष ( बाबा ) श्रीवास्तव यांनी सांगितले.
error: Content is protected !!