August 8, 2025

गौरगाव येथे विविध उपक्रमानी भीम जयंती साजरी

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भीमनगर,गौरगाव येथे दि.२६ एप्रिल २०२४ रोजी शुक्रवारी सकाळी ०८.०० वाजता सरपंच सचिन (नाना) कापसे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांची पूजा करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन ध्वजारोहण संपन्न झाले.
    यानंतर विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    याप्रसंगी उपसरपंच काकासाहेब पाटोळे,ग्रामपंचायत सदस्य मेजर जनार्दन पाटोळे,माजी सरपंच दिलीप कापसे, सदस्य उमेश पाटोळे,पंडित पाटोळे,गोकुळ कांबळे,सह शिक्षक घाडगे,ढोले, प्रभाकर पाटोळे,रोजगार सेवक अण्णासाहेब कापसे,राजाभाऊ पाटोळे आदिंसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
    जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती समिती अध्यक्ष बळवंत कांबळे,सदस्य जालिंदर कांबळे,विद्यासागर कांबळे,सुनील कांबळे, संतोष कांबळे,अनिल कांबळे, बाबासाहेब कांबळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!