August 9, 2025

दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

  • धाराशिव – (जयनारायण दरक) शालेय विद्यार्थ्यांने गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील एका विद्यालयात इयत्ता दहावी बसच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून, सदरील घटना आज बुधवारी (दि.4) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समोर आले नाही.
    संग्राम अशोक विद्यार्थ्याने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमध्ये लोखंडी अडुला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने शाळेतील सकाळचे तीन तास केले व मधल्या सुट्टीत हा प्रकार घडला. शाळेची जेवणाची सुट्टी झाल्यावर विद्यार्थी बाथरूममध्ये गेले, यावेळी घटना उघडकीस आली. विद्यार्थ्याच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.वाशी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
error: Content is protected !!