May 10, 2026

झंझावात मंगरूळ येथे मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत

  • मंगरूळ (जयनारायण दरक) –
    मराठा योद्धा मनोज जरागे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपला संघर्ष व लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
    यासाठी त्यांचा दौरा सुरू आहे.
    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण आंदोलन केले होते. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचमुखी हनुमान मंदिर मंगरूळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर पासून धरणे साखळी आंदोलन सुरू असून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आज ४ ऑक्टोंबर रोजी पंचमुखी हनुमान मंदिर चौक येथे मनोज जरांगे पाटील हे आले असता त्यांचे जोरदार स्वागत केले व आरक्षण विषयी आपली भूमिका मांडली असता या वेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होता .
error: Content is protected !!