लातूर (दिलीप आदमाने )- जगातील विविध राष्ट्रात रोटरी तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ मध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश असून लातूर शहरात रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनची सुरुवात २००७ रोजी झाली. या क्लब तर्फे शिक्षण, शेती, आरोग्य, वृक्ष संवर्धन, महिला सक्षमिकरण, युवक विकास, समुपदेशन, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब), लातूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२च्या प्रांतपाल स्वाती हेरकल आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब), लातूर शाखेचे अध्यक्ष रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. विजयभाऊ राठी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील विविध शाळा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आजपर्यंत ४३७ मुला-मुलींची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून यामध्ये चाकूर येथील आयटीआयमध्ये ११३, लातूर येथील मुलींची आयटीआयमध्ये १५४, महानगरपालिका शाळा क्र. ०९ मध्ये १११, महानगरपालिका उर्दू शाळेमध्ये २४ आणि ग्राम परिवर्तन योजनेर्तगत नागझरी येथे ४५ अशा एकूण ४३७ नेत्र रुग्णांची मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यामध्ये १०५ मुला-मुलींना दृष्टी दोष आढळून आलेला आहे. तर “रत्नानिधी चैरिटेबल ट्रस्ट, मुंबई” कडून मिळालेल्या ८० चष्म्याचे मोफत वाटप सुद्धा करण्यात आले आहे. या संबंधीचा नुकताच एक कार्यक्रम मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी प्रांतपाल डॉ. विजयभाऊ राठी, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनचे अध्यक्ष विश्वनाथ स्वामी सावळे, सचिव महादेव पांडे, माधव भिसे, प्राचार्य संजय मालकुंजे, प्राचार्य रणधीरकर, निदेशक अंजली सारडा, निदेशक भराडे, प्राचार्य शरद पडवळ आणि निदेशक जवळे यांची उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना दृष्टीदोष असेल तर त्याची संपूर्ण मोफत तपासणी आणि चष्म्याचे वाटप केले जाणार आहे याचा नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब), लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. विजयभाऊ राठी आणि रोटरी क्लब ऑफ लातुर होरायझनचे अध्यक्ष विश्वनाथ स्वामी सावळे यांनी केले आहे. रोटरी क्लब दृष्टी परिवर्तन प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गुणवंत बिराजदार, सीए तेजमल बोरा, डॉ. गोपीकिशन भराडिया, प्राचार्य डॉ. संजय गवई, बी. पी. सूर्यवंशी यांच्यासह क्लब मधील सर्व सदस्य, आयटीआय मधील सर्व प्राचार्य, निदेशक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मौलिक सहकार्य लाभले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे