August 9, 2025

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात म.गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

  • कळंब- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो /आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०२ ऑक्टोबर २०२३ सोमवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रासेयो विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतीराम जाधव व डॉ.अनंत नरवडे यांच्या हस्ते राष्ट्रपिता म.गांधी व लालबहादुर शास्री यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.रघुनाथ घाडगे यानी गांधीजी व शास्त्रीजी यांनी देशासाठी केलेल्या महान कार्या विषयी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.जगताप प्रा.शिंदे प्रा.घोळवे प्रा.मिटकरी प्रा.खबाले प्रा.पवार तसेच जयसिंग चौधरी,दत्तात्रय गायकवाड, सुंदर कदम, अशोक भोसले व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!