कळब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुपकर जे .डी., उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर ,उप मुख्याध्यापक जाफर पठाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे परमेश्वर मोरे, ज्ञानेश्वर तोडकर, जीवनसिंह ठाकूर, तानाजी गोरे, शंकर गोंदकर यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी