कळंब- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो /आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०२ ऑक्टोबर २०२३ सोमवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रासेयो विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतीराम जाधव व डॉ.अनंत नरवडे यांच्या हस्ते राष्ट्रपिता म.गांधी व लालबहादुर शास्री यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.रघुनाथ घाडगे यानी गांधीजी व शास्त्रीजी यांनी देशासाठी केलेल्या महान कार्या विषयी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.जगताप प्रा.शिंदे प्रा.घोळवे प्रा.मिटकरी प्रा.खबाले प्रा.पवार तसेच जयसिंग चौधरी,दत्तात्रय गायकवाड, सुंदर कदम, अशोक भोसले व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर