लातूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – देशात आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भारत जोडो अभियान प्रा. योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे ठोस प्रतिपादन अभियानाच्या राज्य समन्वयक उल्का महाजन यांनी मराठवाडा विभागीय कार्यशाळा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. दिनांक ५ व ६ मार्च रोजी भारत जोडो अभियानची दोन दिवसीय मराठवाडा विभागीय कार्यशाळा लातूर येथील बुद्ध गार्डन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे व संभाव्य उमेदवार भाई नगराळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत भारत जोडोच्या लोकसभा व विधानसभेच्या समन्वकांनी आपल्या एकूण रणनीतीचे महत्त्व जाणून घेऊन ते कसे आत्मसात करावे,समर्थक मतांचे एकत्रीकरण,नवीन मतदार नोंदणी,मतदारांना प्रोत्साहित करणे, विविध समाज घटकांशी संवाद साधने, इंडिया आघाडीतील घटक पक्षाशी समन्वय साधने,प्रभावी आणि लवचिक संघटनात्मक रचना कशी करावी पुढील शंभर दिवसाचे नियोजन,नवीन स्वयंसेवक जोडून ठराविक बूथ मध्ये कसे काम करावे, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी, ओबीसी ,शेतकरी आर्थिक दुर्बल, बेरोजगारी आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून नरेटिव्ह तयार करणे, वृत्तपत्र,समाज माध्यम,पत्रकार व इतर प्रसार माध्यमाचा वापर कशा पद्धतीने करावा,उपलब्ध माहितीचा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला जास्तीत जास्त समर्थन मिळवून भाजपा सरकारला पाय उतार करणे यावर ही कार्यशाळा एकूण पंधरा सत्रात दोन दिवस खेळ मेळीच्या वातावरणात संपन्न झाली. दोन दिवस संपन्न झालेल्या या कार्यशाळाचे उत्कृष्ट असे नियोजन भटक्या विमुक्तांचे नेते प्रा.सुधीर अनवले यांनी केले होते. या कार्यशाळेत बेंगलोर येथील कविता कुरूगंटी,उल्का महाजन आणि संजय मंगला गोपाळ यांनी विविध सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन केले.मराठवाड्यातील औरंगाबाद,परभणी,नांदेड, बीड, धाराशिव,लातूर आदी जिल्ह्यातून भारत जोडो अभियानाचे साठ स्वयंसेवकांनी प्रशिक्षणात लाभ घेतला.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे