लातूर (दिलीप आदमाने ) – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ जयंती प्राचार्य दालनात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक अँड. श्रीकांत उटगे आणि अशोक उपासे यांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्रपणे अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, प्रा. रवींद्र सुरवसे, प्रा. धोंडीबा भुरे, डॉ. टी. घनश्याम, विनायक लोमटे आणि यशपाल ढोरमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना डॉ. राजकुमार लखादिवे म्हणाले की, आज संपूर्ण देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.आपण आपल्या महाविद्यालयातही ही जयंती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.त्यांनी सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. यावेळी नामदेव बेंदर्गे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय आपण अभ्यासला तर असे लक्षात येते की, ते सर्वसामान्याचे राजे होते त्यांनी आपल्या सैन्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना सहभागी करून घेऊन त्यांनी अनेक लढाया कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कौशल्याद्वारे जिंकल्याचे आपणास माहिती आहे. त्यांच्यावर जिजाऊ माता यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव असल्याचेही आपणास आढळून येते. यावेळी संस्थेचे संचालक अँड. श्रीकांत उटगे आणि अशोक उपासे यांनी सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांनी केला तर आभार पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय गिरी, योगीराज माकने, शुभम बिराजदार आणि अशोक शिंदे यांनी परश्रम घेतले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे