August 9, 2025

अन्नदान करण्यासाठी मावळा ग्रुप चा आदर्श सर्वांनी घ्यावा – प्रा.डॉ. बाळकृष्ण भवर

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – अन्नदान हे पवित्र दान असून, येथील मावळा ग्रुपने यामध्ये सातत्य ठेवले आहे.शहरात या ग्रुपने शिवजयंती निमित्त अन्नदान करण्यासाठी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वांनी याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत,येडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर यांनी व्यक्त केले.
    कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून शिवजयंतीनिमित्त अन्नदान करणाऱ्या येथील मावळा ग्रुपला, शिवभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. या पूर्वी सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ह. भ .प .महादेव महाराज अडसूळ, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,भाजपाचे शहराध्यक्ष भैय्या बाविकर, शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस बाळासाहेब धस, सेवानिवृत्त शिक्षक सी. आर .घाडगे, अँड.बंडू काळे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सिरसट आदी उपस्थित होते.
    अन्नदानाचे शहर म्हणून कळंब ची ओळख असून, सर्व धर्म समभाव येथे पहायला मिळतो, चाळीस ते पन्नास हजार शिवभक्त दरवर्षी शिवजयंती पाहण्या साठी येतात, त्या सर्वांना अन्नदान करण्यात येते, त्यात मावळा ग्रुप चा मोठा सहभाग असल्याने , हा पुरस्कार त्यांना नक्कीच ऊर्जा देईल असे मत , शिवाजी कापसे यांनी व्यक्त केले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवरायांच्या पुतळ्याचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी प्राध्यापक ह. भ. प. महादेव महाराज अडसूळ, सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत यांनी ही मनोगत व्यक्त केले.पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, या वेळी मावळा ग्रुप चे सुनील पौरे, संजय हाजगुडे, संतोष लांडगे ,सुनील नाकील ,महादेव नरवडे, गणेश शेवते, बाळासाहेब लांडगे, गोकुळ काळे, बबनराव कदम, घोलप बाप्पा, प्रेम कचरे आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जगदीश गवळी यांनी केले तर आभार सतीश टोणगे यांनी मानले. या वेळी ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी आडसूळ ,शितलकुमार घोंगडे संभाजी गिड्डे, प्रदीप यादव आदी पत्रकार उपस्थित होते.
error: Content is protected !!