लातूर (दिलीप आदमाने) – नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला असून या परीक्षेत महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी बस्वदीप रवींद्र बेंबरे याने 95.73 परसेंटाइल गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. त्याबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर अप्पा बिडवे यांच्या हस्ते बसवदीप बेंबरे व पालक प्रकाश बेंबरे यांचा शाल, स्मृती चिन्ह व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादीवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, प्रा. धोंडीबा भुरे, डॉ. मनोहर चपळे, प्रा. विश्वनाथ स्वामी, डॉ. टि. घनश्याम, प्रा. व्यंकट दुडिले आणि प्रा. माधुरी सरपे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शुभेच्छा देताना संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर अप्पा बिडवे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातील असून तो गरीब, गरजू आणि होतकरू कुटुंबातील असतो. अनेकदा त्याला गुण कमी असतात परंतु आपल्या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, समन्वयक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकडे अधिक लक्ष देतात त्यामुळे विद्यार्थी नेत्रदीपक यश संपादन करतात यासाठी संस्था पदाधिकारी मौलिक मार्गदर्शन करतात. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून गुणवंत विद्यार्थी विश्वदीप बेंबरे याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादीवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, प्रा. माधुरी सरपे, आणि प्रकाश बेंबरे यांनी अभिनंदन करून कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. धोंडीबा भुरे यांनी मानले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे