August 9, 2025

२५ ते २९ फेब्रुवारी दरम्यान धाराशिव येथे महासंस्कृती महोत्सव

  • स्थानिक कलावंतांना कला सादर करण्याची संधी
  • धाराशिव (जिमाका) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध भागातील संस्कृतीचे आदान प्रदान,स्थानिक कलाकारांसाठी रंगमंच,लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढयातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती इत्यादि बाबी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी धाराशिव येथे २५ ते २९ फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,
    महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात सभेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये स्थानिक कलावंतांना आपली लोककला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यामध्ये लोकनाट्य,भारुड,पोवाडा,लावणी,गोंधळ,नाटक,एकांकिका,लोकनृत्य, गीत,गझल,मुशायरा,कवी संमेलन,मर्दानी खेळ,महाराष्ट्रातील विविध लोककला,छत्रपति शिवाजी महाराज सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती,पर्यटनविषयक दालन,बचत गट दालन या महोत्सवात राहणार आहे.
    ज्या कलावंतांना आपल्या लोककला महासंस्कृती कला महोत्सवात सादर करावयाच्या आहे. त्यांनी कार्यक्रम पूराव्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे यांचेकडे आपले अर्ज दोन दिवसामध्ये जमा करावे.अधिक माहितीसाठी वृषाली तेल्लोरे- 9665031744, डॉ.प्रा.उषा कांबळे – 9561184858, युवराज नळे – 9623859511,छ्त्रपती शिवाजी महाराज दालन यासाठी केतन पुरी -7620504974 यांच्याशी संपर्क करावा.
error: Content is protected !!