August 9, 2025

डॉ.भीमरावाची “रामू” तथा चाळीस कोटी लेकरांची मायी,घे मानवंदना माता रमाई.!

  • बदलापूर ( तात्यासाहेब सोनवणे) – मानवमुक्तीचे प्रणेते डॉ.भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकरांची “रामू'”,अन् आम्हा चाळीस कोटी लेकरांची माता रमाई.!
    जगाचा निरोप घेताना आम्हा लेकरांची काळजी घेण्याच्या तू मानवमुक्तीचे प्रणेते डॉ.भीमराव तथा बाबासाहेबांना आवर्जून केलेल्या विनंतीत सात समुद्रांची गहराई काय सांगू?अवघ्या धरतीचं औदार्य मावणार नाही ! स्वतःच्या पोटची गंगाधर, राजरत्न, रमेश व इंदू, एकामागून एक दगावत होती, सुकडा यशवंताची भ्रांत सतावत असताना, दु:खाच्या डोंगराखाली हजारो माणसे गाडली गेली, त्या गर्तेत, गाडल्या पणाला बाहेर काढण्यासाठी झुंजणा-या,
    भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणारी, “रमाई’.! आमच्या अभ्यासक आकलनानुसार “रमाई ” नसती तर भिवाचा ,”भीमराव” झालाच नसता.! सुभेदार रामजी बाबांची, आनंदराव,ननंद मीराबाई, यांच्या सन्मान सांभाळत संसार गाडा हाकत होती. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर”,लंडनला असताना रमाईला अनेक पत्रे लिहिले गेले,पण ३० डिसेंबर १९३० रोजी लिहिलेले पत्र, केवळ आपल्या पत्नीला लिहिलेले नसून, पूर्णपणे स्वतःच्या सुखापेक्षा,पिचलेल्या समाजाला अर्थात अंधाराला उजेडात आणण्यासाठी साकारले भावविश्व आहे. ते म्हणतात,रमा आपल्या ठायी आर्थिक सुबत्ता यावी ही संकल्पना निरर्थक आहे. खरच प्रज्ञासूर्यानी आमची बापागत,काळजी घेतली नसती तर तुझ्या लेकरांची “रमाई ” अवस्था काय असती ? आज मला कल्पनाही करवत नाही. .!
    डॉ.बाबासाहेब,आपली कमाल दूरदृष्टी जगाला हेवा वाटावी अशीच.संविधान उदयाला येताना आपली जागतिक मिमांसा आजही आम्हाला हेवा वाटावी अशीच.संविधानाला, न जुमानता राजकीय अराजक अन् आरक्षणाची संहिता काय सांगते? संवेदनशील मन उरले काय? आज माझ्यासारख्या, पत्रकार,लेखक,सामाजिक कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या मान-सन्मानावर फक्त आणि फक्त मोहर आहे ती तुझ्या निस्सीम त्यागाची आणि डॉ.भीमराव तथा बाबासाहेबांच्या आजन्म संघर्षाची !कुठल्या शब्दांत आभार मानू आपले “रमाई”?
    आभार मानायला शब्द जन्माला यायला तरी हवे ..?
    शब्द आ “चंद्र सूर्य” असेपर्यंत तरी जन्माला येणे नाही ,तूझा त्याग साहित्यीक यशवंत मनोहर सरांनी उजागर केलाय “रमाई “,पुस्तकात!! बाकी आज मितीला “जागल्या” म्हणून गस्त घालताना, आवंढा गिळतोय खरा, पण मौनाच्या भाषेपेक्षा,ओठातील शब्दांची भाषाच खरी नाही का? आजच्या वणव्यात .! क्रांतिसुर्य मूकनायक झाला. अन् आम्हाला माणसात आणले.आज अस्तनीतले निखारे पावलांपावलावर.! स्वातंत्र्य,समता,बंधुता ,न्याय, राज्यकर्त्यांनी ,चिखलात माखवला गेलाय.?मग सांग माता रमा,तूझ्या मुक्या लेकरांना प्रस्थापितांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या सत्तापिपासूंच्या विरोधात पेटून उठावच लागेल. फक्त तुझ्या फोटोला हार घालून, गौरवाची भाषणे म्हणजे तूझ्या त्यागाचा इव्हेंट नव्हे? आज कित्येक पिडिताचे संसार उघडयावर आहेत. डिजिटल इंडिया नकाशावर सांगतेय, ६०% गरीबी देशात नांदतेय..! शोषण अन् दमणशाहीनी , लोकांनी, लोकांसाठी चालविलेल्या लोकशाहीतले मुलभूत अधिकार पायदळी तुडवत, सौजन्याची ऐशी की तैशी केली. त्यासाठी तुला नतमस्तक होताना आम्हाला नवा संगर करावाच लागणार आहे. आजच्या
    जयंतीदिनी तुला विनम्र अभिवादन फक्त वंदना,आरती पंचारती करताना, शासकीय, निमशासकीय, लेकींनी तरी पुढें यायला हवं, कारण बदलाचं वारं आजमितीला त्याच फिरवू शकतात असं “जागल्या ” म्हणून गस्त घालताना, जनमताचा कानोसा घेताना अनेकांनी मत नोंदवलय.! तूझ्या त्यागाचं महत्त्व अश्रूंच्या फुलांपेक्षा क्रांतीचं समरगीत व्हावं.
    माता रमाई असं मनोमनी वाटतयं! मानवमुक्तीचे प्रणेते डॉ. भीमराव तथा, बाबासाहेब आंबेडकर यांची “रामू” , चाळीस कोटी लेकरांची मानवंदना घे “माता रमाई.!”
  • – @ समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे,उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत,अध्यक्ष रूग्णहक्क संघर्ष समिती, अध्यक्ष जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, सोशल मीडिया ठाणे ठाणे जिल्हा ग्रामीण, संपर्क – ९३२४३६६७०९
error: Content is protected !!